Mumbai : काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांची मणिपूरमधून निघालेली भारत जोडे न्याय यात्रा आज संध्याकाळपर्यंत मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरात चैत्यभू्ीवर पोहचणार आहे. तब्बल ६३ दिवस आणि ६७०० किलोमीटरचा प्रवास करून आज दुपारी मुंबईमध्ये दाखल होणार असून, ही यात्रा दुपारी ठाण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. ठाण्यातुन एल.व्ही.एस मार्गाने मुलूंड, भांडूप आणि घाटकोपर असा प्रवास करत ही यात्रा आता कुर्ला-सायन परिसरात पोहचेल. आणि त्यानंतर धारावी नाईंटी फिट रोडनं माहिम मार्गाने दादरच्या दिशेने निघेल. सेनाभवन येथुन दादरला शिवाजी पार्क मध्ये चैत्यभूमीवरती दाखल होईल.
राहूल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दादरच्या चैत्यभूमी येथे आज(शनिवार) संध्याकाळी ६ च्या सुमारास समारोप होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी १७ मार्च रोजी दादच्या शिवाजी पार्कच्या मैदानावर राहूल गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील शिवसेना ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी गटाचे शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे महत्वाचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.