#BharatBandh : भारत बंदला ठिकठिकाणी प्रतिसाद
केंद्र सरकारने गतवर्षी संसदेत पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली होती. आमच्या राज्यभरातील प्रतिनिधींनी ठिकठिकाणावरु घेतलेला भारत बंद आंदोलनाचा आढावा....;
रायगड : केंद्र शासना विरोधातील भारत बंद मध्ये रायगड राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी
केंद्र सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणांचा देशभरात कडाडून विरोध होतोय. त्याचे पडसाद आंदोलनाच्या माध्यमातून उमटत आहेत. रायगड जिल्ह्यात अनेक भागांत भारत बंदला प्रतिसाद देत राष्ट्रीय काँग्रेस तर्फे निदर्शने करण्यात आली.
संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेल्या २७ सप्टेंबर रोजी च्या भारत बंद मध्ये सामील होत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा. श्रीमती सोनिया गांधीजी, मा. राहुलजी गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री नाना पटोले साहेब यांनी दिलेल्या आदेशानुसार. राष्ट्रीय काँग्रेस पूर्ण ताकदीने सहभागी होत मोदी सरकार विरोधी फलक हाती घेत निदर्शने केली.
केंद्र शासनाने शेतकरी विरोधी 3 काळे कायदे करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. तसेच रेल्वे, बँका, विमानसेवा, रस्ते, विमा कंपन्या, केंद्र शासनाच्या मालकीचे सार्वजनिक उद्योग, दूरसंचार आणि बंदरे अश्या प्रकारे मोदी सरकारने देशाची संपत्ती विकण्याचा सपाटा लावला असून प्रतिवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचेेे आश्वासन न पाळता उलट युवकांना बेरोजगार केले असून दिलेले आश्वासन संपुष्टात आणले आहे.
तसेच वाढती महागाई विरोधात, पेट्रोल, डिझेल, गॅस, दरवाढी विरोधात लोकभावना लक्षात घेता. आज सोमवार रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. अदानी, अंबानींना आर्थिक लाभ मिळवून देण्याकरिता केंद्र शासनाने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचेेे धोरण अवलंबल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भारत बंद मध्ये सक्रिय सहभाग घेऊन विरोध दर्शविला.
या आंदोलनाला कर्जत तालुका काँग्रेसने कर्जतच्या टिळक चौकात केंद्रातील मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्या विरोधात शेतकरी संघटनानी आज भारत बंदची हाक दिली असून काँग्रेसने या भारत बंद आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला आहे.
नवी मुंबई :
केंद्र सरकारच्या हुकूमशाहीविरोधात काँग्रेसतर्फे आज, २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. या आंदोलनात सर्व उत्स्फूर्तपणे सहभागी होते. शेतकऱ्यांना आणि कामगारांना नेस्तनाबूत करणारे कायदे केंद्र सरकारने आणले. देशात बेरोजगारी वाढत असून, तरुण देशोधडीला लागला आहे. तसेच महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅससह जीवनावश्यक वस्तूंची कृत्रिम महागाई निर्माण केली आहे. केंद्र सरकारने या हुकूमशाहीने शेतकरीविरोधी तीन काळे कायदे आणले. त्या विरोधात नेरुळ येथे आंदोलन करण्यात आलं
अलिबाग एस टी स्थानकात निदर्शने ..........
केंद्र शासनाने लागू केलेले शेतीविषयक कायदे रद्द करावेत तसेच डिझेल , पेट्रोल , गॅस दरवाढ याकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आज रायगडमध्ये काँग्रेस आणि आप एकत्र आले. दोन्ही पक्षांनी मिळून अलिबाग एस टी स्थानक परिसरात निदर्शने केली. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जळगावात भारत बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद
bharat band जळगावात भारत बंद आंदोलनाला मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, कार्यकर्त्यांनी दुकान बंद केली मात्र आंदोलन कर्ते गेल्यानंतर लगेचच लोकांनी वापले व्यवसाय सुरू केले.काँग्रेस माजी खासदार डॉ उल्हास पाटील तसेच राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करत केंद्र सरकार वर टीका केली आहे.
भाजप प्रणित केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन नवीन कायदे केले, मोदी सरकारने केलेले कायदे शेतकरी विरोधी असल्याच आरोप करत देशभरातील विविध शेतकरी संगटना एकत्र आले आणि ह्या आंदोलनाला काँग्रेसने ही पाठिंबा दिला. वर्षभरापासून या कायद्याविरोधात आंदोलन शेतकरी करत आहे. एक वर्ष उलटूनही केंद्र सरकारकडून ठोस भूमिका घेतली नाही. ह्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून देशभर शेतकऱ्यांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली.ह्या आंदोलनाला काँग्रेसनेही समर्थन देत सहभागी होण्याचे जाहीर केलं. राष्ट्रवादीत सत्तेत असलेले काँग्रेस ला राष्ट्रवादीने साथ देत ह्या आंदोलनात सहभागी झाले , सहभागीच झाले नाहीत तर खांद्याला खांद्या लावून बरोबरीने सहभाग नोंदवला राज्यात सर्वच ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकत्र आले , मात्र महाविकास आघाडीचे प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने ह्या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवले आहे .जळगाव जिल्ह्यात सर्वच ठिकाणी दोघे काँग्रेस एकत्र दिसली मात्र शिवसेना ह्या आंदोलनात सहभागी झाली नाही.शिवसेना सहभागी झाली नसल्याने पुन्हा राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढण्यास सुरवात झाली आहे.'