भंडारा शासकीय रुग्णालयामध्ये आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. त्यामुळे या घटनेची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी. तसंच पीडित कुटुंबाला तात्काळ मदत द्यावी. अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी राज्य सरकारला केली आहे.