कृषिमंत्री सत्तार यांची हकालपट्टी करा, भाई जगताप यांची माहिती
शेतकरी आत्महत्येबाबत अब्दुल सत्तार यांनी केलेल्या असंवेदनशील वक्तव्यावरून त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी केली आहे.;
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावर बोलताना शेतकरी आत्महत्या हा काही नवा विषय नसल्याचे असंवेदनशील वक्तव्य केले. त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. मात्र त्यानंतर विधानपरिषदेतही भाई जगताप यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या विषयाकडे लक्ष वेधले.
यावेळी बोलताना भाई जगताप म्हणाले, गेल्या आठ महिन्यात शेतकऱ्याच्या कांद्याला, द्राक्षाला भाव नाही. त्यामुळं शेतकरी उध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. दुसरीकडे कृषिमंत्री यात नवं काय आहे, असं असंवेदनशील वक्तव्य करतात. त्यामुळे अशा कृषिमंत्री सत्तार यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी भाई जगताप यांनी केली.