बीड जिल्ह्यातील 5 नगरपंचायतीसाठी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात
ओबोसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर, पहिल्यांदाचं होत असलेल्या नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यात आज 5 नगरपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे.;
बीड (हरीदास तावरे)// ओबोसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर, पहिल्यांदाचं होत असलेल्या नगरपंचायतीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यात आज 5 नगरपंचायतीसाठी प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील वडवणी, केज, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या 5 ठिकाणच्या नगरपंचायतीसाठी हे मतदान होत आहे. या 5 नगरपंचायतमध्ये एकूण 85 उमेदवार आहेत. त्यापैकी 20 जाग्यावर ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने, निवडणूक होणार नाही. मात्र उर्वरित 65 जागांसाठी बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यासाठी तब्बल 260 उमेदवार आपलं भविष्य आजमावत असून निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर या मतदानाला सकाळी 7:30 पासून सुरुवात झाली असून सायंकाळी 5:30 पर्यंत चालणार आहे.
दरम्यान भाजपचे जेष्ठ नेते राजाभाऊ मुंडे यांनी आपल्या कुटुंबासह वडवणी येथे मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाहीचे हात बळकट करण्यासाठी सर्व मतदारांनी आपला हक्क बजवावा. पाच नगर पंचायतसाठी 65 जागांसाठी मतदान होत आहे, 65 जागांसाठी 260 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.