देशातील जनता महागाईने त्रस्त असतानाच ऐन दिवाळीच्या पार्श्वभुमीवर ST ने भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन दिवाळी च्या तोंडावर एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
एसटी महामंडळाने दि. २० ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ऐन दिवाळीत १० टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे. ही भाडेवाढ दि. २१ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू होणार असली तरी ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
दर वर्षी प्रमाणे ST महामंडळाने यंदा ही दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी च्या तिकीट दरामध्ये १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ साध्या एस टी बससह परिवर्तन, निमआराम, हिरकणी, शिवशाही या सर्व बसेसनाच लागू राहणार आहे. हा निर्णय घेताना महामंडळाने यंदा पहिल्यादांच शिवनेरी आणि अश्वमेघ या गाड्यांना भाडेवाढीतून वगळले आहे. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे. त्या प्रवाशांकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीटदर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येणार आहे. मात्र ही भाडेवाढ एसटीच्या आवडेल तेथे प्रवास, तसेच मासिक, त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही.
दिवाळी सणानंतर दि. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येवून नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जाणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात सातारा जिल्ह्यात लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने हंगामी भाडेवाडीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना सोसावा लागणार आहे