सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याच्या दोन साथीदारांसह फरार आहे. अजूनही पोलिसांना त्याचा माग लागत नाहीये. या प्रकरणाचा तपास आता एसआयटी करणार आहे. खंडणीच्या गुन्हयात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या तपासात एसआयटीच्या हाताला काय लागतं यावर बरेच अवलंबून आहे. बीडमधला जंगलराज कधी संपणार? फरार आरोपींना कोणी पाठीशी घालतंय ? धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध मुंडेंना किती अडचणीचे ठरणार ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इथली दहशत संपवंताना किती कसरत करावी लागणार ? यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं सडेतोड विश्लेषण ऐका.