धुळवडीच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढणारे गाव !
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा गावची जावयाला गर्दभस्वारी घडवणारी अनोखी परंपरा...
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा या गावातील जावयावर गाढवावर बसून जावयाची मिरवणूक आज धुलिवंदनाच्या दिवशी काढली जाते त्याचबरोबर गाढवाला चपलांचा हार घातला जातो गावभर मिरवणूक काढून मनपसंत कपड्यांचा आहेरही जावयाला दिला जातो (107)एकशे सात वर्षाची परंपरा जपण्यासाठी जावयाची गदर्भ वारी काढली जाते तर दुसरीकडे या परंपरेतून सामाजिक एकोपो व सलोखा जपला जात आहे विशेष यंदा गदर्भ सवारीचे मानकरी अमृतराव देशमुख ठरले आहेत अमृत राजे श्रीमंत देशमुख हे जावई ता. वैराग जि .सोलापूर येथील आहेत तर जावईशोध पथकाचे सुरज पटाईत ,तुकाराम पटाईत, चिंतामण काळे, डॉ. उदय पवार, दिपक वाघमारे, अजय पटाईत, शेख आदींनी या जावयांना पकडले आहे.
त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील हे गाव निजाम कालीन राजवटीतील जाहागीरदार तत्कालीन जाहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांचे वारसदार ठाकूर अमीर सिंग देशमुख सांगतात साधारण 1915 साली दिवंगत आनंद राव देशमुख यांचे चिंचोली येथील मेहुणे धुलिवंदनाच्या दिवशी वेड्यात आले आणि धुलीवंदनाच्या दिवशी या गावात आले म्हणजे त्यांचा खास पाहुणचार व्हावा यासाठी गावातील प्रमुख मंडळींनी धुलिवंदनाचा पाहुणचार करण्यासाठी जावयाची गाढवावरून धिंड काढली व त्यावेळी देखील जावायाची थट्टामस्करी सुरू झाली आणि मग मस्करी जावईबापू गावकऱ्यांनी गाढवावर बसून सवारी काढली तेव्हापासून ही परंपरा सुरू असल्याचे चांगले सांगितले जात आहे.