कांदा चाळ अनुदानासाठी 2 हजाराची लाच स्विकारतांना कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

18 वर्षापासून एकाच कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यकाचा प्रताप...;

Update: 2023-06-01 02:19 GMT

सनाकडून विविध योजना शेतकऱ्यांना दिल्या जातात मात्र या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे आपण अनेक वेळा पाहिला आहे. मात्र ज्यावेळेस एखादी योजना शेतकरी करत असतो त्यावेळेस जे सरकारी अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत ते मात्र त्या अनुदानातील काही पैसे लाटण्याचे काम करत असतात. असाच एक प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील कृषी विभागात घडला आहे. कांदाचाळीचे अनुदान मंजुरीसाठी कृषी सहाय्यकाने 2 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्याची घटना पाटोद्यात(Patoda) घडली आहे. हा सापळा बीड(Beed) एसीबीच्या(ACB) पथकाने यशस्वीरीत्या पार पाडला आहे.




 


 

काय आहे प्रकार...

पाटोदा तालुक्यातील सौताडा या गावातील दिलीप असराजी सानप हे येथील रहिवासी असून त्यांच्या शेतात कांदाचाळ मंजूर झाली असून, त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान कृषी अधिकारी कार्यालयातुन अनुदान मंजूर करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. यात कृषी सहाय्यक कृष्णा महादेव आगलावे यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 हजार रुपयाची लाच देण्याचे ठरविले. दरम्यान याबाबत दिलीप सानप यांनी एसीबी कडे तक्रार दिली.

या अनुषंगाने पथकाने दि.31 मे बुधवार रोजी दुपारच्या सुमारास कृषी अधिकारी कार्यालयात सापळा रचून 2 हजार रुपयांची लाच स्विकारतांना कृषी सहाय्यक कृष्णा आगलावे याला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




कृष्णा आगलावे हा गेली 18 वर्षापासून एकाच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होता. सौताडा येथे कृषी सहाय्यक कर्तव्य बजावत होता. गेली अनेक वर्षापासून पाटोदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या या कृष्णा आगलावेंनी अनेक शेतकऱ्यांची पिळवणूक केली असल्याची माहिती मिळत आहे. विशेष करून शासनाने दिलेल्या शेतकऱ्यांच्या योजनेवर डल्ला मारायचं हे काम करत असल्याचं अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्या होत्या, मात्र त्यांच्याकडे पुरावा नसल्याने आगलावे हा मोकळा सुटायचा मात्र या प्रकरणात तो शेतकऱ्यांने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्याने कृष्णा आगलावे हा जाळ्यात सापडला आहे.

 


Tags:    

Similar News