धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गडावर भाविकांची आलोट जनसमुदाय विठूरायाच्या हरिनामत दंग झाले. महाराष्ट्रात तसेच धाकटी पंढरी बीड येथे वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे. प्रतिपंढरपूर म्हणुन ओळखले जाणारे राज्याची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडावर संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा आलोट जनसमुदाय ऊसळला होता. विठू रायचे दर्शन घेण्यासाठी राज्य भरातून भाविक मोठया संख्येने सहभागी झाले आहेत. समाजाने गुण्यागोविंदाने रहावे तसेच शेतकऱ्यांचे चांगले दिवस यावेत आसे मागणं गडाचे महंत शिवजी महाराज यांनी म्हटले आहे दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या या मध्ये महीला भगिनीची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.