महाराष्ट्रात चाललंय काय? राज्यात कायद्याचा धाक उरला आहे की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात पडलेल्या दरोड्यात दोन महिलांवर अत्याचार घडल्याची घटना घडली आहे. त्या पाठोपाठ पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पिंपरखेड येथे दिवसाढवळ्या बँकेवरती सशस्त्र दरोडा पडला. हे सत्र इथंच थांबलेल नाही. जळगाव पोलीस अधिकारी आणि पोलिसांना लाथा, बुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
त्यामुळं महाराष्ट्रात नक्की काय़ सुरु आहे. असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लोणी येथे अतिक्रमण निर्मूलन हटावच्या कारवाई दरम्यान पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांची मारहाण केली आहे.
गावातील अतिक्रमण कारवाईला विरोध करत शिवीगाळ करून गावातील लोकांनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आहे.
लोणी ग्रामपंचायतीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या अतिक्रमण बंदोबस्तांसाठी गेलेले पहूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व त्यांचे सहकारी पोलीस नाईक दिनेश मारवडकर यांना मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून, याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.