बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला कोरोनाची लागण

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला देखील कोरोना संसर्ग झाला आहे.

Update: 2021-12-28 05:12 GMT

नवी दिल्ली // बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला देखील कोरोना संसर्ग झाला आहे. गांगुलीला कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सौरव गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.

सौरव गांगुलीची रात्री उशिरा कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेण्यात आला.

वर्षभरात दुसऱ्यांदा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे. गतवर्षी सौरवला ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्यानंतर गांगुलींला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात दाखल केले गेले होते.

दरम्यान कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झालेल्या सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याची गरज नसल्याचे नातेवाईकांनी म्हटल्याचे वृत्त आहे. सौरवच्या चाहत्यांनी त्याच्या प्रकृती स्थिरतेसाठी प्रार्थना केली आहे.

Tags:    

Similar News