आजपर्यंत आपण शिवजयंती असेल किंवा इतर कोणत्याही महापुरुषांची जयंती असेल, तर बॅनर लागलेले पाहतो. त्यावर एखाद्या नेत्याचा फोटो आणि पाच पन्नास कार्यकर्त्यांचे फोटो असतात. बीडमध्येसुद्धा शिवजयंती निमित्त अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. पण बीड शहरातील या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा आहे आणि त्याचे कौतकुही होते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चहूबाजूंनी, मावळा प्रतिष्ठान आणि बजरंग बली प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी, जवळपास बारा मोठ मोठे बॅनर लावले आहेत. त्या बॅनरवर गड किल्ल्यांची माहिती दिली आहे. शिवनेरी किल्ला, पुरंदर किल्ला, प्रतापगड, तोरणा किल्ला, रायगड , राजगड यासह अनेक गडकिल्ल्यांची या बॅनरवर आकर्षक मांडणी करत माहिती देण्यात आली आहे.