पंकजा मुंडे यांना कॅबिनेट मंत्री करण्यात यावे यासाठी बीड शहरात लागले बॅनर...!

Update: 2024-06-09 12:31 GMT

आज एनडीएच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, ज्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची हॅटरीक केली असून नरेंद्र मोदी यांच्या प्रधानमंत्री पदाच्या शपथविधीच्या पूर्वसंध्येला बीड शहरात पंकजा मुंडे यांना वरिष्ठ नेतृत्वाने कॅबिनेट मंत्री पद द्याव अशा मागणीचे बॅनर लागल्याचे पाहायला मिळत आहे.  हे बॅनर त्यांचेच कार्यकर्ते गणेश लांडे यांनी लावलेले असून ताईंना कॅबिनेट मंत्रीपद द्यावं यासाठी बॅनरबाजी करून मागणी केली आहे. 

काही दिवसांपूर्वी देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि त्याचा निकाल ही जाहीर झाला मात्र बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे या खासदार म्हणून निवडून येतील असा कयास लावला जात होता, मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आणि पंकजा मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा  लागला.मात्र त्यानंतरही पंकजा मुंडे यांना मंत्रीपदावर पाहण्याची कार्यकर्त्यांन मधली जिद्द संपली नाही.पंकजा मुंडेंनी यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं, जय पराजय राजकारणात होतचअसतो मात्र, धीर सोडून चालणार नाही. लोकसभेत पराभव पत्कराल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या. बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी समाजकंटाकाकडुन पंकजा मुंडे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करण्यात आलं.  त्यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण हे तणावाचं निर्माण झालं होतं मात्र हे वातावरण ताज असतानाच बीड जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्टि  आणि वरिष्ठ नेतृत्वाने कॅबिनेट मंत्रीपद द्यावे या मागणीचे बॅनरही आज बीड शहरा लागले आहेत. यामुळे आता या बॅनरची चर्चा सध्या जिल्ह्यासह महाराष्ट्रात होऊ लागली आहे.

Tags:    

Similar News