पुढच्या महिन्यात तब्बल 12 दिवस बंद राहणार बँका!
सप्टेंबर महिन्यात तब्बल 12 दिवस बँका बंद असणार आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक सण, उत्सव असल्यामुळे बँकेला सुट्टी असणार आहे.;
मुंबई : सप्टेंबर महिन्यात तब्बल 12 दिवस बँका बंद असणार आहे. सप्टेंबर महिन्यात अनेक राष्ट्रीय आणि स्थानिक सण, उत्सव असल्यामुळे बँकेला सुट्टी असणार आहे. त्यामुळे बॅंक ग्राहकांना त्या दृष्टीने आपली बँकेची कामं उरकून घ्यावी लागणार आहेत. जरी सध्या सर्वांचा भर डिजिटल व्यवहारांकडे असला तरी काही कामांसाठी मात्र ग्राहकांना बँकेतच जावं लागतं. त्यामुळे बँकेशी संबंधित काही काम किंवा बँकेतून मोठी रक्कम काढायची असेल लवकर करावी लागणार आहे.
सप्टेंबर महिन्यात या दिवशी असणार बँकेला सुट्टी!
* 5 सप्टेंबर- रविवार
* 8 सप्टेंबर – प्रकाश उत्सव (पंजाब मध्ये स्थानिक सुट्टी)
* 9 सप्टेंबर- सुहाग पर्व तीज (स्थानिक सुट्टी)
* 10 सप्टेंबर- गणेश चतुर्थी (स्थानिक सुट्टी)
* 11 सप्टेंबर- दुसरा शनिवार
* 12 सप्टेंबर- रविवार
* 17 सप्टेंबर- कर्मा पूजा
* 19 सप्टेंबर- रविवार
* 20 सप्टेंबर- इंद्र जत्रा (स्थानिक सुट्टी)
* 21 सप्टेंबर- नारायण गुरु समाधी दिवस (स्थानिक सुट्टी)
* 25 सप्टेंबर- चौथा शनिवार
* 26 सप्टेंबर- रविवार
दरम्यान आजपासून सलग चार दिवस बँका बंद असणार आहे. आता बँका थेट 1 सप्टेंबरला सुरू होणार आहे. या महिन्याच्या शेवटी सणांमुळे बँक सलग चार दिवस बंद असणार आहे.त्यात चौथा शनिवारी आणि उद्या रविवार असल्याने बँका बंद असतील. तर गोकुळाष्टमी असल्याने 30 आणि 31 तारखेला देशाच्या विविध भागांत बँका बंद राहतील.