खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकर यांना अखेर ताब्यात गेण्यात आली आहे. बंडातात्या यांना फलटणमधून सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याआदी बंडातात्यांनी पत्रकारांशी बोलताना आपण माफी मागितल्याचे सांगितले होते. पण माफी मागतांनाही बरेच आढेवेढे घेणाऱ्या बंडात्यांनी माध्यमांवर खापर फोडून स्वत:चा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. "मी बोलण्याच्या ओघात अनावधानाने काही राजकीय नेत्यांची नावे घेऊन आरोप केले त्याच्या बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो" असे बंडातात्या यांनी सांगितलं आहे. तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबद्दल आपण जे बोललो ते निराधार असून त्यांची आपण माफी मागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
वाईन विक्रीच्या निर्णया विरोधात बंडातात्या यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी साताऱ्यामध्ये व्यसनमुक्त युवक संघाने आंदोलन केले होते. पण त्यांच्यावर बेकायदेशीरपणे जमाव जमवत आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह जवळपास एकशे पंचवीस जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे जमाव जमलेल्या प्रकरणी ही कारवाई केली असल्याचे सातारा शहर पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली आहे.
व्यसनमुक्त युवक संघटेने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या विरोधात आंदोलन केले होते. त्यावेळी बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील काही नेते आणि त्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडता तसेच याचे पुरावेसुद्धा असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांचासुद्धा उल्लेख केला होता. त्यामुळे राज्यभरातून तीव्र शब्दात टीका केली जाते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलन केले आहे, तसेच बंडा तात्यांवर कारवाईची मागणी केली आहे.