आक्रमक, शिवराळ असली तरी बाळासाहेब ठाकरेंची भाषण गाजायची, परिणाम साधायची. कुणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोक बोलण्याची बाळासाहेबांची खासियतच होती. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि शिवसेनेतला संघर्षही महाराष्ट्रानं वेळोवेळी बघितलेला आहे.
वागळेंचं आक्रमक लिखाण अनेकांना टोचायचं, या लिखाणाचे पडसादही उमटायचे, कारण त्यात भूमिका असायच्या...एकदा वागळेंनी खुद्द बाळासाहेबांनाच विचारलं की तुम्ही मला कुठली शिवी द्याल, त्यावर बाळासाहेबांनी क्षणाचाही विलंब केला नाही...