माझ्या सत्संगातून अंधश्रद्धा पसरवली जात असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) ने ती सिद्ध करून दाखवावी. असे खुले आव्हान धिरेद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी दिला आहे.
माझ्या सत्संगांमध्ये मी हनुमान कथा सांगतो. अनेक लोकांचे अनुभव जाणून घेतो. या माध्यमातून मी कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही. मी करत असलेल्या सत्संगांमधून अंधश्रद्धा पसरली जाते असा आरोप जर अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत असेल तर त्यांनी समक्ष याव 'दूध का दूध आणि पानी का पानी करू' असे मत भागेश्वर बाबा यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
सत्संगामध्ये कथा सांगत असताना, काही उदाहरणे देत असताना एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ हे काढले जातात कोण कशाचा कुठे कसा अर्थ काढेल हे सांगता येत नाही. अनिस ने बागेश्वर बाबा यांच्या विरोधात जादूटोणाविरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यावर बोलताना बागेचे बाबा यांनी हे स्पष्टीकरण दिले.