शिवरायांचा फोटो हटवलेल्या नगरपरिषदेत भाजपची सत्ता, आमदार सतेज पाटील यांचा दावा

Update: 2023-08-19 12:40 GMT

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावरून राज्यात राजकारण पेटलं आहे. भाजपने कर्नाटक सरकारवर टीका केली आहे. त्याला आमदार सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कर्नाटकमधील बागलकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्नाटक सरकार आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र आता काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपवर टीका करत पुतळा हटवलेल्या नगरपरिषदेत भाजपचीच सत्ता असल्याचा दावा केला आहे.

भाजपने दुसऱ्याकडे बोट दाखवले तर चार बोटं तुमच्याकडे असतील, असं म्हणत सतेज पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Tags:    

Similar News