तेजापूर गावामधील रस्त्याची दुरवस्था; सिमेंट रस्ता बनवून देण्याची ग्रामस्थांची मागणी

यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील तेजापूर गावामधील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता सिमेंटचा बनवून देण्याची ग्रामस्थांची मागणी केली आहे.

Update: 2021-07-28 02:13 GMT

यवतमाळ // यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील मुकुटंबनपासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या तेजापूर गावातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

तेजापूरातील वार्ड क्रमांक दोन मधील रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशीच काहीशी अवस्था निर्माण झाली आहे.या रस्त्याने शाळकरी मुले,वयोवृद्ध नागरिक,मोठ्या प्रमाणात महिला ये-जा करतात त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

दरम्यान संबंधित रस्ता सिमेंटचा बनवावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे.या रस्त्याची आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार,ग्रामपंचायतमधील सरपंच, सचिव

यांनी पाहणी करावी असंही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

लवकरात लवकर या रस्त्याचे काम केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

Tags:    

Similar News