'बचपन का प्यार' फेम सहदेव दिरदो रस्ता अपघातात गंभीर जखमी

'बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे' या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा सहदेव दिरदो याचा मोठा रस्ता अपघात झाला आहे. या अपघतात सहदेव गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.;

Update: 2021-12-29 02:53 GMT

मुंबई // 'बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे' या गाण्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा सहदेव दिरदो याचा मोठा रस्ता अपघात झाला आहे. या अपघतात सहदेव गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या अपघातानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात गंभीर जखमी झालेला सहदेव दिसत आहे. त्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून नेताना दिसत आहे.

याबाबत माहिती मिळताच सहदेवचे सर्व चाहते दु:खी झाले आहेत. सहदेववर पूर्ण उपचार केले जातील, असे आश्वासन छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या आश्वासनानंतर सहदेवला जगदलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील सहदेवच्या 'बचपन का प्यार' या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे त्याला 'इंडियन आयडॉल 12' शोमध्येही बोलावण्यात आले होते. सहदेवच्या व्हिडिओमुळे तो इतका लोकप्रिय झाला की छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही त्यांची भेट घेतली होती आणि गाणे ऐकले होते.

Tags:    

Similar News