ST कर्मचाऱ्यांच्या पागरावरून बच्चू कडूं कडाडले

ST कर्मचाऱ्यांच्या पगारावरून बच्चू कडूंचा थेट विधान साभा अध्यक्ष यांनाच सवाल.

Update: 2024-07-02 07:26 GMT

मुंबई (विधान सभा) - एस टी (ST) कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आपण चर्चा करत आहोत. मात्र सभागृहाच्या अध्यक्षानीच सांगावं एस टी (ST) कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा पगार हा योग्य आहे का. तुमचा वाहन चालकाला किती पगार देता ते सांगा जरा. एसीत बसणाऱ्या तुमच्या चालकाला पगार देता, तेवढा पगार आमच्या ST चालकाला व कर्मचाऱ्यांना का देत नाही. ST कर्मचाऱ्यांसंदर्भात प्रश्न मांडत असताना किमान सत्य बोला. असा सवाल बच्चू कडू यांनी विधानसभा सभागृहात निर्माण करत विधान सभा अध्यक्ष आणि मंत्र्यांना विचारला.

आमचा ST कर्मचारी उन्हातानात एसटी चालवतो. चारी बाजूने घामाघूम होतो. त्याला पगार कमी आणि तुमच्या वाहन चालकाला पगार जास्त असा भेदाभेद का करता. असे म्हणणे देखील बच्चू कडू यांनी मांडले. किमान वेतन नियमानुसार, व कायद्या प्रमाणे ST कर्मचाऱ्यांना किमान चौदा हजारापेक्षा अधिक पगार मिळायला हवा. असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

तरांकित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून राज्यातील एस टी (ST) कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विधान सभेमध्ये चर्चा सुरू होती. ST कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, समस्या संदर्भात चर्चा चालू असताना बच्चू कडू यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आक्रमक भूमिका पाहायला मिळाली.या वेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मंत्री दादा भुसे उत्तर देत होते. एसटी कर्मचाऱ्यांना दहा तारखेच्या आत पगार भेटत असून, एसटी वाहक आणि चालकाला सरासरी 38 हजार रुपये इतके मानधन देखील दिले जाते. असे देखील मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

Tags:    

Similar News