बाबरी मशीद खटल्याचा ३० सप्टेंबरला, अडवाणी, उमा भारतींना हजर राहण्याचे आदेश

तब्बल २८ वर्षांनी बाबरी मशिद प्रकरणाच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ३० सप्टेंबरला लखनऊच्या विशेष सीबीआय कोर्ट या खटल्याचा निकाल देणा्र आहे. न्यायमूर्ती एस.के.यादव यांनी निकालाच्या दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणींसह सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल देण्यासाठी गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाने विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. या प्रकरणात एकूण ३२ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यात देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा यांचा समावेश आहे.
२८ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद पा़डण्यात आली होती. रा मंदिरासाठी देशभरात झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व लालकृष्ण अडवणी यानी केले होते. याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टात हजर झाले होते. यावेळ त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.