बाबा सिद्दीकी यांची गोळीबारात हत्या

बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.;

Update: 2024-10-12 17:34 GMT

बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर काही तसपूर्वी गोळीबार करण्यात आला होता, ज्या मध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली आहे. निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर होती बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असतांना अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार, SRA प्रकल्पाच्या वादात हा गोळीबार असल्याच पुढे येत आहे. गोळीबारा दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली होती. याशिवाय त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) नेते रुग्णालयात दाखल झाले आहेत. माहिती पुढे येताच बाबा सिद्दीकी यांचे मित्र अभिनेता संजय दत्त,भाजप नेते आशिष शेलार रुग्णालयात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही काही वेळात लिलावती रुग्णालयात दाखल होतील. रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. 

Tags:    

Similar News