भारतात 'भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट'च्या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लसीबाबत आपल्या स्टाइल मध्ये भाषण ही ठोकलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली लस मोदींचे निकटवर्तीय उद्योगपती बाबा रामदेव ही लस घेणार का? असा सवाल त्यांना एका माध्यमांच्या मुलाखतीत विचारला असता, त्यांनी आपण ही लस घेणार नसल्याचं सांगितलं आहे.
मी ही लस घेणार नाही. कारण मला या लसीची गरज नाही. मी या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की, मी कोरोनाची लस घेणार नाही. मला या लसीची आवश्यकता नाही. मला कोरोना होणार नाही. मी अनेक लोकांच्या भेटी घेतो. थोडी फार कोरोनबाबतची काळजी देखील घेतो. कोरोनाचे कितीही अवतार आले तरी मला काही होणार नाही. स्वामी रामदेव का योगावतार जिंदाबाद।
कोरोना हळूहळू कमी
होतोय का? यावर बोलताना ते म्हणाले
2021 पर्यत सर्वसामान्य लोकांना ही लस मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. ही लस नाही तर हा एक बचाव आहे. मी या लसीच्या विरोधात नाही. मात्र, या लसीमध्ये 6 महिन्यानंतर किती प्रमाणात प्रतिकार शक्ती राहील. अशी शंका उपस्थित करत योग केला तर सतत प्रतिकार शक्ती आपली शाबुत राहील. असं म्हणत बाबारामदेव यांनी लसीच्या प्रतिकार क्षमतेपेक्षा योग शक्ती अधिक असल्याचं म्हटलं आहे.
तसंच यावेळी रामदेव बाबा यांनी आपण या लसीच्या ना विरोधात आहोत. ना या लसीच्या बाजूनं असं म्हणत ज्याला गरज आहे. त्यांनी ही लस जरूर घ्यावी. असं मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केलं आहे.
एकंदरित बाबा रामदेव यांचा मोदींनी सांगितलेल्या लसीपेक्षा योगावर भरोसा जास्त आहे.