कोरोनाचे संकट घराघरात जाऊन पोहोचलेय. वैद्यकीय सुविधा अपुरा पडत असल्याने बेड, व्हेंटिलेटर,ऑक्सिजन औषधांचा तुटवडा जाणवत आहे. योग गुरु रामदेव बाबांनी माणसाचं नाक सिलेंडर असून फुप्फुसाच्या माध्यमातून निसर्गातील मुबलक ऑक्सिजन मिळवता येईल, असा दावा केला आहे. रामदेव बाबांना शरीरशास्त्र शास्त्र समजतं का? 70 ऑक्सिजन असलेल्या रुग्णाला रामदेवबाबांनी खरंच बरं करून घरी पाठवलं का? कोरोना पेशंटला कृत्रिम ऑक्सिजनची गरज का पडते? गंभीर कोरोना प्रादुर्भाव असताना योग आणि प्राणायाम करणे योग्य आहे का? रामदेव बाबांचे दावे खरे की खोटे? या दाव्यांमध्ये राजकीय वास येतो का?
रामदेव बाबा हास्यास्पद अवैज्ञानिक दावे करून सर्वसामान्य जनतेला उल्लू बनवत आहेत का? रामदेव बाबांच्या दाव्यांची पोलखोल केली आहे डॉ. संग्राम पाटील यांनी....