ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी होते. नवी मुंबईतील नेरूळमध्ये वास्तव्यास होते. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
ज्येष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी आपलं आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी अर्पण केलं. रोखठोक वाणी आणि शुद्ध विचार हे बाबा महाराज सातारकर यांचं व्रत होतं. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचं प्रबोधन केलं. दरम्यान, यावर्षीच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यानंतर 8 महिन्यानंतर बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली.