पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची आरास

Update: 2021-08-18 04:08 GMT

पंढरपूर :पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक आज श्रावण शुध्द पुत्रदा एकादशी निमित्ताने विविध फुलांनी सजवण्यात आले. रांजणगाव येथील विठ्ठलभक्त नानासाहेब पाचुंदकर यांनी ही सजावट केली.

श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा सोळखांबी, चारखांबी तसेच मंदिराच्या विविध भागाना झेंडु, ग्लेंडर, कामिनी, केशरी झेंडु, निळ्या रंगाचा ब्ल्यु डिजे,आष्टर, पिवळा झेंडु, शेवंती, पांढऱ्या रंगाचा टौटिस, गुलाब, ड्रेसिना, ऑरकिड्स अशा विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली. यासाठी सजावटीसाठी जवळपास दोन टन फुलांचा वापर करण्यात आल्याचे माहिती पाचुंदकर यांनी दिली.

विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा अक्षरशः उजळून निघाला आहे. या सजावटीमुळे विठुरायाचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

Tags:    

Similar News