महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान, कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाला आज सोमवती अमावस्या निमीत्त 101 डझन केळीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी जेजुरीच्या खंडोबाला विशिष्ट पद्धतीने फेटा बांधण्यात आला तसेच भानाई मातेला व म्हाळसा मातेला साडी चोळी अर्पण करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील खंडोबा भक्त उद्योजक संतोष गवारे यांच्या वतीने जेजुरीच्या खंडोबा मंदिरात ही आकर्षक सजावट करण्यात आली होती.
यावेळी स्वप्नील महाजन,संदीप शिंदे, सुभाष लुंकड,कुंदन केंडे यांच्या उपस्थितीत जेजुरीच्या खंडोबा दुग्धाभिषेक घालण्यात आला.तसेच राज्यावर आलेलं कोरोना संकट लवकर दूर होवो अशी प्रार्थना खंडोबा भक्तांनी जेजुरीच्या श्री खंडोबा देवाकडे केली.