तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त पंढरपूर येथील मंदिराची आकर्षक रंगीबेरंगी फुलांची सजावट

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आज तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे.;

Update: 2021-08-23 04:06 GMT

राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आज तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही सजावट मुंबई येथील विठ्ठल भक्त शशिकांत मढवी यांनी केली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभारा सोळखांब, चारखांब तसेच मंदिराच्या विविध भागांना , गुलाब, शेवंती, गुलछडी ,निळ्या रंगाचा ब्ल्यू डीजे, ग्लेंडर, पिवळा झेंडु , कामिनी, पांढऱ्या रंगाचा टौटिस, ड्रेसिना, औरकेड अशा विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांची आरास करण्यात आली.

या सजावटीसाठी जवळपास एक टन फुलांचा वापर करण्यात आल्याची माहिती विठ्ठल भक्त शशिकांत मढवी यांनी दिली. विविध रंगीबेरंगी फुलांनी देवाचा गाभारा अधिकच उजळून निघाला आहे.

Tags:    

Similar News