'तीस-तीस' गुंतवणूकदाराचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
मराठवाड्यात खळबळ उडवून देणाऱ्या 'तीस-तीस' प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. तर मुख्य मोहरक्या संतोष राठोड विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हतबल झालेल्या एका गुंतवणूकदाराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने संबंधित व्यक्तीचा जीव वाचवता आला आहे.
कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर आता अनेक गुंतवणूकदार पोलिसात जाऊन तक्रार देत असल्याचे समोर आले आहे. तर याच तीस-तीस पैसे गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीने काल विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र बिडकीन पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला वाचवलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीने अनेक राजकीय नेत्यावर तीस-तीसमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे तीस-तीसमध्ये राजकीय नेत्यांचा सुद्धा सहभाग असल्याचं समोर आला आहे.