वाशिमच्या कामरगावात वीज उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न ; स्वाभिमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण

Update: 2021-11-20 03:38 GMT

वाशिम :  सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. त्यांची प्रकृती ढासाळली आहे. सोयाबीनला 8 हजार तर कापसाला 12 हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, आता या आंदोलनाला हिंसक वळण लागत असल्याचे पहायला मिळतंय. तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील वीज उपकेंद्र पेटविण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान दुसरीकडे काल रात्री देखील आंदोलस्थळी पोलीस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पोलीस आणि कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यानंतर आंदोलनस्थळी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

Tags:    

Similar News