आरक्षणावरून दंगली घडवण्याचा प्रयत्न - ॲड. प्रकाश आंबेडकर

Update: 2023-11-18 11:13 GMT

Akola : सद्या राज्यात आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सद्या पहायला मिळतं आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. अकोल्यातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे ओबीसी संवाद बैठक पार पडली. छगन भुजबळांनी  (Chhagan Bhujabal ) जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणाहून मनोज जरांगेंना (Manoj jarange Patil ) आव्हान देण्याची गरज काय होती? असा थेट सवाल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान आंबेडकर म्हणाले की "आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण, आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्या जिल्ह्यात बैठका घेऊ. अंबडच्या आजच्या सभेत भुजबळांनी जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार आहे? आपल्याला एकत्र राज्यातच रहायचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News