किमान कार्यकर्त्यांना तरी पवार गुप्त भेटींबाबत स्पष्टता असली पाहिजे - अंबादास दानवे

Update: 2023-08-13 03:31 GMT

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली आहे. उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी दोन्ही नेत्यांची बैठक झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील बैठकीला उपस्थित होते. याभेटी नंतर उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली.

खरंतर शरद पवार यांनी मी भाजप सोबत जाणार नाही असं स्पष्ट सांगितलय, मात्र तरीसुद्धा अशा भेटीमुळे सगळ्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. त्यामुळे किमान कार्यकर्त्यांसाठी तरी अशा भेटींबाबत स्पष्टता असली पाहिजे असेही अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Tags:    

Similar News