अंबाजोगाई तालुक्यात मृत्यूतांडव! 23 रुग्णांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; तर दोघांचा दफनविधी....!
बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता आकडा चिंताजनक असताना मृत्युदर देखील वाढला आहे. यातच अंबाजोगाई तालुक्यात प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांची संख्याही वाढत असल्याने भयावह परिस्थिती आहे.
शनिवार व रविवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या 25 रुग्णांवर नगरपरिषदेने अंत्यसंस्कार केले. यात 23 जणांना एकाच वेळी अंत्यसंस्कार तर 2 जणांचा दफनविधी करण्यात आलाय.
सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, अनेक जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे..!