30+30+40, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनाचा आराखडा ठरला

Update: 2021-07-03 02:16 GMT

मुंबई – कोरोनाच्या संकटामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या करीअरच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली बारावीची परीक्षाही रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना या परीक्षेचे मार्क कसे मिळणार, त्यांचे मुल्यमापन कसे केले जाणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होता. पण आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुल्यमापनाचा आराख़डा ठरल्याचे जाहीर केले आहे.

यासाठी विद्यार्थ्यांच्या दहावी, अकरावीच्या वर्गातील मार्क तसेच बारावीच्या वर्षांतील त्यांची एकूण कामगिरी याच्या आधारार गुण दिले जाणार आहेत.  मुल्यमापनाचा आराखडा केंद्रीय माध्यमिक मंडळांप्रमाणेच ठेवला गेला आहे.

मुल्यांकनाचा हा फॉर्म्युला 30 + 30+ 40 असा ठरवण्य़ात आला आहे. या सुत्रानुसार विद्यार्थ्याला दहावीच्या परीक्षेत ज्या तीन विषयांमध्ये सर्वाधिक मार्क मिळाले आहेत ते मार्क गृहित धरण्यात येतील. दहावीच्या तीन विषयांतील मार्क 30 टक्क्यांच्या मर्यादेत मोजले जातील. तसेच अकरावीच्या परीक्षेत मिळालेल्या मार्कांसाठी 30 टक्के तर बारावीच्या वर्षांतील टेस्च, प्रोजेक्ट, आणि प्रॅक्टिकल, तेसच तोंडी परीक्षा यांच्यासाठी 40 टक्क्यांनासर मार्क देण्यात येतील. अशाप्रकारे तीन वर्षातील कामगिरी या 30+30+40 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यानुसार ठरणार आहे. पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे फक्त दवाहीचे मार्क आणि बारावी या दोन वर्षांची कामगिरी मोजली जाणार आहे. त्यासाठीचे सूत्र मात्र 50 + 50 असे असेल. म्हणजे दहावीच्या गुणांसाठी 50 टक्के अणि बारावीच्या मार्कांसाठी 50 टक्क्यांपैकी मार्क दिले जातील.

Tags:    

Similar News