कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी मुंबईतील सर्व व्यवस्था नागपूरला खास अधिवेशनासाठी हलवण्याऐवजी हिवाळी अधिवेशनच मुंबईत घेण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे खास अधिवेशनासाठी नागपूरला जाणार्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अधिवेशन आयोजित करण्यासाठी सरकारच्या वतीने नागपूर आणि मुंबईमध्ये आढावा घेण्यात आला होता . नागपूर मध्ये केवळ सुरक्षेसाठी प्राप्त 8000 पोलीस राज्याच्या इतर भागातून नागपूर मध्ये बोलावले जातात. विधिमंडळ आणि मंत्रालयाचा मोठा स्टाफ मुंबईतून खास अधिवेशनासाठी नागपूरला जातो.नागपुर मधील आमदार निवास कोविड सेंटर म्हणून वापरात होते .
त्यामुळे कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे मुंबईचा घेण्याचा निर्णय झाला आहे. येत्या 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज विधिमंडळ कामकाज समिती बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशन हे नागपुरात घेण्यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहेत. महाराष्ट्र राज्य स्थापनेला झालेल्या करारानुसार वर्षातील एक अधिवेशन हे नागपुरात घ्यावे अशी तरतूद आहे. भाजप आमदार गिरीश महाजन आणि भाजपचे काही आमदार नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशन व्हावे यासाठी आग्रही होते. आज झालेल्या कामकाज सल्लागार बैठकीमध्ये विविध पर्याय चर्चा झाल्यानंतर एकमताने अधिवेशन मुंबईत घेण्याचे ठरले.