आधिवेशन आणि लग्नसोहळ्यामुळे अनेक व्हिआयपी कोरोनाबधीत

नुकतेच पार पडलेले विधीमंडळाचे हिवाळी आधिवेशन आणि त्यालगत झालेल्य लग्न सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हिआपी लोक कोरोनाबाधीत झाले आहे.;

Update: 2021-12-30 09:25 GMT

नुकतेच पार पडलेले विधीमंडळाचे हिवाळी आधिवेशन आणि त्यालगत झालेल्य लग्न सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हिआपी लोक कोरोनाबाधीत झाले आहे. लग्नसोहळ्यानंतर माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना कोरोनाची लागण झाली असून मुंबईच्या ताज पॅलेसमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्यात राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेत. त्यापाठोपाठ मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तीन दिवसांपूर्वी वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी टि्वट करुन ही माहिती दिली आहे.

''सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती,'' असे टि्वट हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.

आधिवेशन संपताना दोन दिवसापूर्वी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला. मुंबईच्या ताज पॅलेसमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्यात राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती. गेल्या अनेक दिवसांपासून अंकिता आणि निहारच्या लग्नाची चर्चा होती. या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सपत्निक हजेरी लावली आणि वधु-वरांना शुभेच्छा दिल्या. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी या विवाहाचे फोटो शेअर केले आहेत.

अंकिता पाटील यांच्या लग्नसोहळ्यास उपस्थित असलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी करुन घ्यावी लागणार आहे. तिसरी लाट येणार की काय अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे तर ओमायक्रॉनचेही रुग्ण वाढत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सुद्धा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तनपुरे यांनी ट्वीट करून आपल्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह सदानंद सुळे आणि दोन मुले सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. बुधवारी सकाळी सुप्रिया सुळे यांनी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती ट्वीट करून दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा होम क्वारंटाइन झाल्याची माहिती समोर आली आहे.

राधाकृष्ण विखे पाटीलही पॅाझिटिव्ह

भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ते हिवाळी अधिवेशात उपस्थित होते. त्यानंतर ते काल शिवाजी कर्डिले यांच्या मुलांच्या लग्नाला उपस्थित होते.

राज्यात 3900 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. गेल्या 24 तासामध्ये 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2900 रुग्णांपैकी मुंबईत 2510 रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबई महापालिकेकडून शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची माहिती देण्यात आली आहे. आज एकाच दिवसामध्ये कोरोनाचे नवे रुग्ण २५१० आढळून आले आहे.

Tags:    

Similar News