'भारत जोडो' यात्रेनंतर अशोक चव्हाणांवरील संशय दूर.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर आहेत. अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. भारत जोडो यात्रेनंतर अशोक चव्हाणांवरील संशय दूर झाला. हि यात्रा नांदेड जिल्ह्यात पोहचल्यानंतर अशोक चव्हाण यांनी योग्य प्रकारे नियोजन केले होते.;

Update: 2022-11-13 11:46 GMT

काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपाच्या वाटेवर असल्याचे काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात चर्चा होती. या विषयावर देखील अशोक चव्हाण यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. भारत जोडो यात्रा नांदेड जिल्ह्यात आल्यानंतर अशोक चव्हाण यांनी योग्य प्रकारे नियोजन केल्याने लोकांचा वाढता प्रतिसाद पाहायाला मिळात होता. त्यामुळे केंद्रातील काँग्रेसचे नेते देखील अशोक चव्हाण यांच्यावर खुश आहेत. महाराष्ट्रातील पहिल्यांदा नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रा आली होती. राहुल गांधी भेटत नाहित असे अनेकदा अफवा पसरवण्यात आली होती. नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत सुशिलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण यांची हसरी छायाचित्रेही पाहायाला मिळाली.

त्यामुळे आता तरी अशोक चव्हाण सध्या काँग्रेस मध्येच आहेत. आणि राहतील, असा विश्वास व्यक्त करणे अयोग्य ठरणार नाही. नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी यांचा लोकांसोबत आणि महाविकासआघाडीतील नेत्यांसोबत संपर्क वाढला असून याचा लाभ अशोक चव्हाण यांना नक्कीच मिळेल. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील मराठीत भाषण केले. महाराष्ट्रात हि यात्रा १३ दिवस असणार आहे. त्यामुळे लोकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशोक चव्हाण हे कधी ही भाजप मध्ये जाऊ शकतात, असा काँग्रेसच्या नेत्यामध्ये संशय होता. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे आता अशोक चव्हाण यांच्यावरील संशय दूर झाला.

Tags:    

Similar News