भारतीय जनता पक्षाने आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये 99 उमेदवारांची नावं समाविष्ट आहेत. यामध्ये काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे, तर काहींचा तिकीट कापण्यात आला आहे.
यादीनुसार, मुंबईतून 14 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, वांद्रे पश्चिममधून आशिष शेलार आणि मालाडमधून विनोद शेलार यांना एकाच घरात उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे या परिवारात भाजपची विशेष जागा असल्याचे दिसून येते.
तर, वादग्रस्त वर्सोवा आणि बोरिवली मतदारसंघांमध्ये अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाहीत, तसेच दहिसर आणि घाटकोपर पूर्व मतदारसंघांमध्येही तिकीटांची घोषणा केली गेलेली नाही.
उमेदवारांच्या यादीत चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा मतदारसंघातून तर देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या या पहिल्या यादीने आगामी निवडणुकीच्या वातावरणात चुरशीच्या लढती होण्याची शक्यता .