भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे. माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मी सध्या उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:चं विलिगिकरण करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
I have tested positive for #Covid_19 today. I am under medication & advice all those who have been in contact with me to isolate themselves & seek medical guidance. I remain available here & via my office for hlp & assistance to Mumbaikars !
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 14, 2021
दरम्यान राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आज राज्यात कोरोनाचे ५० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. या दुसऱ्या लाटेत आज रोजी राज्यात एकूण ६,१२,०७० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.