मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला Aryan Khan क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन सध्या जामिनावर बाहेर आहे. आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार आर्यन खानला दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत NCB कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. ३० ऑक्टोबर रोजी आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला होता.
तब्बल २७ दिवस तो तुरुंगात होता. २ ऑक्टोबर रोजी NCB ने समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली कॉर्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर छापेमारी करत काही जणांना ताब्यात घेतले होते, काहींजवळ ड्रग्ज आढळून आले होते. या प्रकरणात आर्यन खानसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. यावेळी आर्यनसोबत मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट हे दोघे सुद्धा तुरुंगात होते. आता तिघे जामिनावर बाहेर आहेत.दरम्यान आज आर्यन खान NCB च्या कार्यालयात हजेरी लावणार आहे.