AryankhanDrugCase:साक्षीदारांना फितवण्याचा प्रयत्न: एनसीबीचा उच्च न्यायालयात थेट आरोप

Update: 2021-10-26 08:56 GMT

एनसीबी विरोधात आर्यन खान हे प्रकरण आता उच्च न्यायालयात जाऊन पोचले असून गेल्या काही दिवसातील घडामोडींमुळे NCB नं आक्रमक स्वरूप धारण करत थेट शाहरुख खान यांच्या मॅनेजर पूजा ददलानी वर आरोप करत आर्यन खान च्या वतीने साक्षीदारांना फितवून पुरावे नष्ट करून तपास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे त्यांना कदापि जामीन मंजूर करू नये अशी मागणी प्रतिज्ञापत्र सादर करून केली आहे.

या प्रकरणाचा साक्षीदार प्रभाकर साईल यांनी प्रतिज्ञापत्र कोर्टापुढे सादर केलेले नाही उलट ते प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रकाशित केले आहे.

प्रभाकर साईल यांच्या प्रतिज्ञापत्र वरून त्यात ते थेट पूजा ददलानी च्या संपर्कात असल्याचे दिसून येते. तपास सुरू असताना अशाप्रकारे कृती करणं म्हणजे तपास कामात अडथळा आणण्याचा प्रकार असून जामीन नाकारण्यासाठी हे पुरेसं कारण असल्याचा एनसीबीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

थोड्याच वेळात उच्च न्यायालय त्यासंबंधीचे सोनवणे सुरुवात होणार असून आर्यन खान याला बेल मिळणार की जेल त्यावर उच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे.

Tags:    

Similar News