दिल्लीत अखेर कडक लॉकडाऊन! केजरीवाल म्हणाले…

Update: 2021-04-19 08:19 GMT

दिल्लीत आजपासून संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आज सोमवार रात्री 10 वाजल्यापासून पुढच्या सोमवार पर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे.


दिल्लीत कोरोना केसेस वाढल्या..

रविवारच्या आकडेवारीनुसार राजधानी दिल्लीत 25 हजार 462 नवीन कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. दिल्लीतील पॉजिटीव्ह रेट 30 टक्क्यावर जाऊन पोहोचला आहे. म्हणजे टेस्ट केलेल्या 100 लोकांमध्ये 30 लोक पॉझिटीव्ह आढळत आहेत.

काय म्हटलंय केजरीवाल यांनी...

पुढील 6 दिवसात दिल्लीमध्ये कोरोना विरोधात लढण्यासाठी व्यवस्था करु. आमची मदत केल्याबद्दल केंद्रसरकारचे आभार. या काळात सर्वांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावं. आम्ही चाचण्या कमी केल्या नाहीत तर वाढवल्या. दिल्लीत रोज १ लाख चाचण्या होत आहे. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत कधीही खोटं बोललो नाही. जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली. दिल्लीत गेल्या २४ तासात २३ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. दिवसाला २५ हजार रुग्ण मिळत असतील तर आरोग्य व्यवस्था ढासळेल. दिल्लीत १०० पेक्षी कमी आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. एका खासगी रुग्णालयाने तर रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपला होता असं सांगितलं. मात्र वेळीच उपलब्ध झाल्याने खूप मोठी दुर्घटना टळली. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीमध्ये परिस्थिती गंभीर आहे.

केजरीवाल यांची कामगारांना विनंती...

माझ्यावर विश्वास ठेवा हा लॉकडाउन नाइलाजानं करावा लागत आहे. कुणीही दिल्ली सोडू नका, विश्वास आहे की लॉकडाउन वाढवायला लागणार नाही. रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा आहे. या सहा दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात बेड वाढवू. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. लॉकडाउनच्या काळात आम्ही ऑक्सिजनची औषधांची बेड्सची व्यवस्था करू

अशी विनंती केजरीवाल यांनी दिल्लीतील कामगारांना केली आहे.

Tags:    

Similar News