'अर्णब-गेट' प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे: रामदास आठवले
`अर्नबगेट` प्रकरणातून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. केंद्र सरकारनं याची गंभीर दखल घेऊन या बाबतीत जे काय सत्य आहे ते बाहेर यायला हवं. दोषी कोण हे समजायला हवं. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली.;
रिपब्लिकन चैनल चे संपादक अर्णव गोस्वामी यांनी एस के दास यांच्यासोबत व्हाट्सअप चॅटिंग केलेले त्याच्यासमोर आल्यानंतर या चार्ट मध्ये अनेक गोष्टी उघडकीस आले आहे.
टीआरपी घोटाळ्याचा तपास चांगल्या पद्धतीनं सुरु आहे. त्यात काही टीआरपी वाढल्याचा प्रकार घडल्याचं उघड झालंय, ही चौकशी वरिष्ठ अधिकारी करत आहेत. पुलवामा, बालाकोट हल्ला झाल्यानंतर ते चॅट वायरल झालेत ते गंभीर आहे, असं आठवले म्हणाले.
२६ फ्रेबुवारीला हल्ला झाला, २३ तारखेला त्याला माहिती कशी मिळाली. या सर्व गोष्टी राष्ट्रध्वज सुरक्षेचा मुद्दा समोर आला असून यासंदर्भात ही सर्व माहिती कुणी पुरवण्यात आली होती च्या विरोधात असून यामध्ये बालाकोट मध्ये होणाऱ्या स्ट्राइक हे तीन दिवस अगोदरच माहिती मिळाली.