गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात बँकेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा

Update: 2021-10-22 05:55 GMT

औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यात पडलेल्या दरोड्यात दोन महिलांवर अत्याचार घडल्याची घटना ताजी असताना पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पिंपरखेड येथे दिवसाढवळ्या बँकेवरती सशस्त्र दरोडा पडला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पाच बंदूकधारी दरोडेखोरांनी दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान हा दरोडा टाकत बँकेतील कॅशर ला ही मारहाण केली आहे. दरोडेखोरांनी 31 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच दोन कोटी रुपयांचे सोने चोरून नेल्याची माहिती बॅक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सातत्याने घडलेल्या या घटनांमुळे राज्यातील कायदे सुव्यवस्था ठिकाण्यावर आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात असून पुणे ग्रामीण पोलिसांपुढे दरोडेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

Full View

Tags:    

Similar News