राज्यात पॉलिटीकल प्रदुषण वाढले आहे का? आदित्य ठाकरेंनी दिले उत्तर

Update: 2022-04-02 10:18 GMT

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडीत चांगलाच कलगितुरा रंगला आहे. त्यापार्श्वभुमीवर पुणे येथे राज्यात पॉलिटीकल प्रदुषण वाढले आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्याला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले.

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे येथे पर्यावरण परिषद पार पडली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, पर्यायी इंधन कुठले मिळेल याचा विचार सुरू आहे. तसेच येत्या काही वर्षात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन दिसतील. तर हे ज्या नागरिकांना इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

पुणे हे शहर ऑटोमोबाईलसाठी प्रसिध्द आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी इथे यावे. त्यांना इथे अनेक चांगले पर्याय मिळतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दुचाकी, बसचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, पेट्रोल, डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक व३हनांना खर्च कमी येतो. त्यामुळे पुणे, औरंगाबाद, मुंबई येथे इलेक्ट्रिक बसचा खर्च कमी होईल. त्याबरोबरच आगामी काळात राज्यात स्क्रॅपींग पॉलिसी राबवण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कार्यक्रमानंतर पत्रकरांनी आदित्य ठाकरे यांना विचारले की, राज्यात पॉलिटीकल प्रदुषण वाढले आहे का? असा प्रश्न विचारला. थ्री व्हीलरचं काम चांगलं चालू आहे, अशा शब्दात उत्तर देत प्रश्नाला फाटा दिला.

Tags:    

Similar News