भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार होते. डॉ. सिंग यांची पंतप्रधान म्हणून कारकीर्द कशी होती ? प्रशासक म्हणून सनदी अधिकारी त्यांच्याकडे कसे पाहत होते ? त्यांना उदारमतवादी धोरणाचे जनक का म्हटले जाते ? परदेशातील नामवंत माध्यमसमूहांनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख कसा केला ? डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारी चर्चा घडवून आणली आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी. या चर्चेत सहभागी झाले आहेत, माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी महेश झगडे आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के.