महाराष्ट्राचे मुख्य सचिव पदी नितीन करीर यांची नियुक्ती

Update: 2023-12-31 12:23 GMT

Nitin Karir : सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे आज ३१ डिसेंबर २०२३ ला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी आता नवे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Chief Secretary of Maharashtra: नितीन करीर यांची महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १९८८ च्या बॅचचे IAS असलेले नितीन करीर हे सध्या वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. काही वेळात ते सीएस मनोज सौनिक यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक आज ३१ डिसेंबर २०२३ ला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी IAS नितीन करीर यांची नियुक्ती केली जाणार आहे. २०२०च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान नितीन करीर यांच्यावर महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News