मुंबईत आता गर्दीच्या ठिकाणी अँटीजेन चाचणी

Update: 2021-03-21 00:43 GMT

मुंबईमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. आता गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या अँटीजेन टेस्ट केल्या जाणार आहेत. आपत्तीव्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत हा निर्णय़ घेण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीची अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी त्या व्यक्तीची संमती घेतली जाणार नाही, असेही महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अशाच प्रकारच्या चाचण्या शनिवारी दादरमध्ये करण्यात आल्या. दादरच्या फुल मार्केटमध्ये 215 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यापैकी 6 जण कोरोना पॉझीव्ह सापडले आहेत.

दरम्यान मुंबईत शनिवारी कोरोनाचे 2 हजार 982 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 7 रुग्णांचा कोरोनामुळे 24 तासात मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्य़ा 302 इमारती सील करण्यात आल्याची माहितीही महापालिकेतर्फे देण्यात आली आहे.

Similar News